(डावीकडून, कंगना रनोट, मनीष मल्होत्रा आणि कृती सेनन)
मुंबई - दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या आगामी 'फाइंडिंग फॅनी' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग मंगळवारी ठेवण्यात आले होते. तिस-यांदा स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनमधील अनेक सेलेब्स हा सिनेमा बघण्यासाठी पोहोचले होते.
कंगना रनोट, कृती सेनन, डिझायनर मनीष मल्होत्रा, लेखक
चेतन भगत, अभिनेता राहुल देव, मुग्धा गोडसे, किरण राव, पल्लवी शारदा यांच्यासह आणखी काही सेलेब्स यावेळी दिसले. कंगना जीन्स आणि टी-शर्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये दिसली. तिने लेदर बूट घातले होते. तर दुसरीकडे कृतीसुद्धा कॅज्युअल वेअरमध्येच दिसली.
येत्या 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणा-या या सिनेमात
अर्जुन कपूर, दीपिका पदुकोण, नसीरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया आणि पंकज कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...