आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर माझ्याशी कुणी लग्न करणार नाही - कंगना राणावत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘रिव्हॉल्व्हर राणी’ या चित्रपटातील माझी भूमिका पाहिल्यानंतर कुणीही माझ्याशी लग्न करण्याचे धाडस करणार नाही, असे अभिनेत्री कंगना राणावत हिने एका मुलाखतीत सांगितले. जुहू येथील जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तिने उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी अभिनेता वीर दास, दिग्दर्शक साई कबीर, सहनिर्माता तिग्मांशू धुलिया यांची उपस्थिती होती. कंगनाने चित्रपटात अलका सिंग ही अत्यंत बोल्ड भूमिका साकारली आहे.

चंबळ खोर्‍यामध्ये 50 अंश डिग्री तापमानत चित्रीकरण करणे अवघड होते. तसेच अलकाची अत्यंत बोल्ड भूमिका साकारणे खूप अवघड होते. ‘क्वीन’ चित्रपटाच्या यशानंतर रिव्हॉल्व्हर राणीमधील ही भूमिकादेखील यशस्वी ठरेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. ‘अब मर्दको दर्द होगा’ या कॅचलाइनमागे अलकाचीच भूमिका आहे. तिचा पोशाख, आक्रमक रूप व बिनधास्त वागणे पाहता प्रत्यक्ष आयुष्यात या भूमिकेनंतर माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय कुणाला घेता येणार नाही, असेही गमतीने कंगनाने सांगितले.

साई कबीर यांचा पहिलाच चित्रपट
दिग्दर्शक म्हणून साई कबीर यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या माध्यमातून राजकारणावर ब्लॅक कॉमेडीद्वारे भाष्य करण्यात आले आहे. तसेच चित्रपटात एक प्रेमकथाही दडली आहे. येत्या 25 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक कंगनाला या चित्रपटातही भरभरून प्रतिसाद देतील, असा विश्वास या वेळी तिग्मांशू धुलिया यांनी व्यक्त केला.