आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिन कव्हर पेज लाँचिंग इव्हेंटमध्ये दिसला कंगणाचा असा लूक, पाहा ग्लॅमरस फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्राजिया मासिकाच्या कव्हर पेजच्या लाँचिंग इव्हेंटमध्ये अभिनेत्री कंगना राणावत
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतला ग्राजिया मासिकाने आपल्या कव्हर पेजवर स्थान दिले आहे. मासिकाचा हा अंक ऑगस्ट महिन्यासाठी काढण्यात आला आहे. हे मासिक महिलांच्या विषयांवर आधारित आहे. त्यामध्ये महिलांच्या मतासह ब्यूटी टिप्स आणि फॅशनबाबतच्या गोष्टी दिल्या आहेत.
या मासिकाच्या कव्हर पेज लाँचिंग इव्हेंटमध्ये कंगणा अगदीच ग्लॅमरस लूकमध्ये दिसून आली. तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. मासिकाने कंगणाला या अंकासाठी 'Queen Bee' नाव दिले आहे. कव्हर पेजवर कंगणा ब्लेजर लूकमध्ये स्टाइलिश पोज देताना दिसली.
'क्वीन' सिनेमातील अभिनयाने कंगणा यावर्षी चांगलीच चर्चेत आहे. तिचा 'रिव्हॉल्वर राणी'मधील अवतारही लोकांनी पसंत केला. तिचा आगामी सिनेमा 'उंगली' असून यात तिच्यासह इम्रान हाशमी दिसून येणार आहे. हा सिनेमा 21 नोव्हेंबर 2014मध्ये रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा लाँचिंग इव्हेंटमध्ये कशी दिसली कंगणा...