आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, कंगनाला मिनरल वाटरने का करावी लागतेय अंघोळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत 'क्वीन'च्या यशाने सध्या बरीच आनंदी दिसत आहे. सिनेमाच्या यशानिमित्त 26 मार्च रोजी तिने जंगी पार्टीदेखील दिली. ती अलीकडेच नवीन फ्लॅटमध्ये स्थायिक झाली आहे. परंतु तिच्या फ्लॅटमध्ये महानगरपालिकेकडून पाण्याची सुविधा देण्यात आली नाहीये. त्यामुळे कंगना अंघोळीसाठी मिनरल वाटरचा वापर करते.
कंगनाच्या जवळील एका सुत्राच्या सांगण्यानुसार, ती मुंबईच्या खार परिसरातील एका उंच इमारतीत स्थायिक झाली आहे. परंतु या इमारतीच्या फ्लॅटमध्ये पाणी आणि लाइटसारख्या मुलभूत सुविधा अद्याप दिल्या गेलेल्या नाहीत.
सुत्रांनी सांगितले, की 'कंगनाला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर फ्लॅटमध्ये स्थायिक व्हायचे होते. परंतु त्यावेळी फ्लॅटमध्ये काही सुविधा नव्हत्या. ती अद्याप मिनरल वाटरनेच आंघोळ करते.'
या अपार्टमेन्टला महानगरपालिकेकडून इमारत पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच या इमारतीत लोक राहू शकतात, हे यातून स्पष्ट होते. परंतु राहणा-या लोकांना बीएमसीकडून अद्याप मुलभूत सुविधा दिल्या गेलेल्या नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि याविषयी आणखी माहिती...