आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाच्या सातव्या आसमानावर 'क्वीन', आता 'दुर्गा रानी' बनणार कंगना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलाकाराला त्याच्या वयापेक्षा मोठे दाखवण्यासाठी आणि चेह-याचा आकार, रुप बदलण्यासाठी वापरण्यात येणारे प्रोस्थेटिक मेकअप तंत्रज्ञान बॉलिवूडमध्ये हिट झाले आहे. या मेकअपच्या माध्यमातून प्रियांका चोप्राला तिच्या आगामी सिनेमात मेरीकोमच्या रुपात सादर केले जाणार आहे. आता बातमी आहे, की आगामी 'दुर्गा रानी' या सिनेमात कंगना राणावतसुद्धा प्रोस्थेटिक मेकअपचा वापर करणार आहे.
मुंबई - अलीकडेच रिलीज झालेल्या 'क्वीन' या सिनेमामुळे अभिनेत्री कंगना राणावत सध्या सातव्या आसमानावर आहे. या सिनेमाच्या यशाने 'रज्जो'चे अपयश पुसून काढले आहे. आता आगामी 'दुर्गा रानी' या सिनेमाकडून तिला ब-याच अपेक्षा आहेत.
'क्वीन'चे यश चाखल्यानंतर आता कंगना आगामी सिनेमांच्या तयारीला लागली आहे. सध्या तिच्या हातात दोन सिनेमे आहेत. एक म्हणजे 'तनू वेड्स मनू'चा सिक्वेल आणि दुसरा सिनेमा 'दुर्गा रानी' आहे. या सिनेमात तिने विद्या बालनला रिप्लेस केले आहे.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या कधी सुरु होणार सिनेमाचे शुटिंग आणि यापूर्वी कोणकोणत्या कलाकारांनी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेतली आहे...