आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kangana Takes An Early Exit From Queen’S Success Bash

कंगनाने साजरे केले 'क्वीन'चे यश, पाहा PARTY PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'क्वीन' या सिनेमाला मिळालेले यश पाहून अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेता राजकुमार राव आणि दिग्दर्शक विकास बहल सध्या भलतेच खूश आहेत. बुधवारी या स्टार्सनी आपल्या सिनेमाला मिळालेले यश साजरे करण्यासाठी एक जंगी पार्टी आयोजित केली होती. 'क्वीन'च्या सक्सेस बॅशदरम्यान मीडियाशी बोलताना कंगनाने आपला आनंद व्यक्त केला.
कंगनाने सिनेमाला मिळालेले यश केक कापून साजरे केले. त्यानंतर तिने मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र एवढं सगळं असताना एक गोष्ट अचंबित करणारी ठरली. ती म्हणजे कंदना सक्सेस पार्टी एन्जॉय करण्याऐवजी लवकरच तेथून निघून गेली.
कंगना तेथून लवकर निघून गेली असली तरीदेखील दिग्दर्शक विकास बहल आणि अभिनेता राजकुमार राव यांनी उशीरा रात्रीपर्यंत पार्टी एन्जॉय केली. यावेळी 'फँटम' सिनेमाचे आणि व्हायकॉम 18चे क्रू मेंबर्स पार्टीत सहभागी झाले होते. सिनेमाची सक्सेस पार्टी मुंबईतील एका प्रसिद्ध क्लबमध्ये आयोजित करण्यात आली होती.
असो, 'क्वीन'च्या सक्सेस पार्टी मीडियाशी बोलताना कंगना खूप आनंदी दिसली. या सिनेमासाठी अवॉर्ड्सच्या प्रतिक्षेत आहे का? असा प्रश्न विचारल्यावर ती म्हणाली, ''मला अवॉर्ड्सविषयी मुळीच उत्सुकता नाहीये. सिनेमाला मिळालेले यश पाहूनच मी आनंदी आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा 'क्वीन'च्या सक्सेस बॅशची खास झलक...