'क्वीन'ला मिळालेल्या यशानंतर कंगनाकडे सिनेमांच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या आहेत. निर्माते-दिग्दर्शक तिला आपल्या सिनेमात घेण्यास उत्सुक आहेत. मात्र कंगना काही निवडक ऑफर्स स्वीकारत आहे. इतकेच नाही तर कंगनाने आता आपली वाढलेली मागणी पाहता मानधनात भरघोस वाढ केली आहे. आपल्या प्रत्येक सिनेमासाठी आजवर दीड कोटी रुपये घेणारी ही अभिनेत्री आता एका सिनेमासाठी निर्मात्यांकडे चार कोटींची मागणी करत आहे.
'कहानी'चे दिग्दर्शक सुजॉय घोष 'दुर्गा रानी सिंह' हा सिनेमा कंगनाच्या हातात आहे. या सिनेमात सुरुवातीला विद्या बालन काम करणार होती. मात्र काही कारणास्तव विद्याने हा सिनेमा सोडला आणि आता कंगनाने या सिनेमाची सायनिंग अमाऊंट चार कोटी रुपये घेतली आहे. सुजॉयकडे विद्यानंतर कंगना एकमेव चांगला पर्याय होती, त्यामुळे त्यांनी कंगनाला चार कोटी रुपये दिले. अलीकडेच कंगनाने मुंबईतील खार परिसरात 22 कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे.
'दुर्गा रानी सिंह' या सिनेमात कंगनासह इरफान खान मेन लीडमध्ये आहे. कोलकत्त्यात या सिनेमाचे शुटिंग सुरु आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून पुढील दोन महिन्यात सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे.