आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kannada Actress Nayana Krishna Arrested In Honeytrap Blackmail Case

सेक्स टेप बनवून ब्लॅकमेल करणा-या दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाक्षिणात्य अभिनेत्री नयना कृष्णाला एका डॉक्टरचा सेक्स टेप बनवून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले आहे. तसे पाहता, तिला दुस-या एका ब्लॅकमेलिंग प्रकरणात अकट केली होती. मात्र या दुस-या प्रकरणातसुध्दा नयनाला पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, बंगळुरुच्या सुंदर राम शेट्टी नगरच्या एका डॉक्टरने नयनावर ब्लॅकमेल केल्याला आरोप लावला. पोलीस उपायुक्त अभिषेक गोयल यांनी सांगितले, 'नयनाला आपल्या विरोधात दाखल केलेल्या दुस-या तक्रारीविषयी माहित नव्हते. ती आपल्या विरोधात दाखल झालेल्या पहिल्या प्रकरणाबाबत तपास अधिका-यांना भेटण्यासाठी मंगळवारी (7 ऑक्टोबर) सीसीबी कार्यालयात गेली. तिथे आम्ही तिला अटक केली.' पोलिसांनी नयनाला बुधवारी (8 ऑक्टोबर) नयनाला कोर्टात हजर केले. कोर्टाने तिला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत कलम 389 (extortion), 506 (criminal intimidation), 120B (criminal conspiracy) लावण्यात आल्या आहेत.
सांगितले जाते, की यापूर्वी 4 जून रोजी नयनाच्या विरोधात एका 68 वर्षीय डॉक्टरांनी सेक्स टेप रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावला होता. डॉक्टरने तिच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले होते, 'नयना आणि तिच्या साथीदारांनी त्यांच्या गँगमधील एका महिलेसोबत सेक्स करण्याचे लालूच दाखवले. त्यानंतर त्यांनी गुपचुप त्याचा टेप बनला. या सेक्स टेपच्या आधारे गँगने त्या डॉक्टरांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पहिल्या या गँगने डॉक्टरांना 1 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर ते 25 लाख देण्यास तयार झाले.'
डॉक्टरने या प्रकरणातील सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. नयना फरार झाल्यानंतर चार महिने पोलिसांच्या हाती लागली नव्हती. नयना सध्या दोन्ही ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणामुळे पोलिस कोठडीत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सेक्स टेप बनवून ब्लॅकमेल करणा-या नयनाची काही छायाचित्रे...