(फोटो- 'पीके' पोस्टरवर आमिर खान आणि 'ओके' पोस्टरवर पूनम रॉय)
नवी दिल्ली- आमिर खान 'पीके' सिनेमाच्या पोस्टरवर विवस्त्र झाला होता. त्याच्या या अवताराने सर्वांना धक्का बसला होता. आता पुन्हा एक धक्का, दिग्दर्शक कांती शाहने त्याच्या 'ओक' सिनेमाचे पोस्टरने दिला आहे. 'ओके' सिनेमाचे पोस्टर 'पीके'च्या धरतीवर तयार करण्यात आले आहे. यावर अभिनेत्री विवस्त्र झालेली दिसत आहे. तिच्या गळ्यात कॅमेरा लटकलेला आहे. 'पीके'च्या पोस्टरवर आमिर खानने हातात ट्रान्जिस्टर पकडलेला होता. 'ओके'च्या पोस्टरवर या अभिनेत्रीने हातात कॅमेरा पकडलेला आहे.
'ओके'चे पोस्टर
'ओके'च्या पोस्टरवर सिनेअभिनेत्री पूनम रॉय एका रेल्वे ट्रॅकवर उभी आहे. अशाच लोकेशनवर आमिर खान 'पीके'च्या पोस्टरवर दिसत होता. 'ओके'च्या पोस्टरवरील अभिनेत्री आमिर खानप्रमाणेच विवस्त्र दिसत आहे. फक्त तिने ट्रान्जिस्टरऐवजी हातात कॅमेरा पकडलेला आहे. 'ओके'ची कहानी देह विक्रीवर आधारित आहे.
कोण आहे कांती शाह?
कांती शाहचा बॉलिवूडचा बी-ग्रेड सिनेमांचा दिग्दर्शक मानला जातो. त्याने अनेक सिनेमे बनवले आहेत. त्यामध्ये मिथुन चक्रवर्तीची मुख्य भूमिका असलेला 'गुंडा' हा सिनेमा प्रमुख आहे. शिवाय, त्याने अंगूर, गरम, रंगबाज, फूलन हसीना रामकली, बसंती तांगेवाली, गंगा जमुना की ललकार हे सिनेमे तयार केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा टि्वटर यूजर्सचे पोस्टरवर काय म्हणणे आहे ...