आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SHOOTING:नवरदेव बनला कॉमेडी किंग कपिल, स्वयंवरात थाटले एलीसोबत लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शूटिंग सेटवर वर-वधूच्या रुपात कपिल शर्मा आणि एली अवराम)
अजमेरः कॉमेडी किंग कपिल शर्मा सध्या आपल्या आगामी 'किस किस को प्यार करुं' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाद्वारे कपिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. कपिलच्या या सिनेमाचे शूटिंग राजस्थानात सुरु आहे. जोधपूर, अजमेर येथील किशनगढ आणि पुष्करमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.
गुरुवारी सिनेमाची टीम शूटिंगसाठी पुष्करमध्ये दाखल झाली. व्हिनस प्रॉडक्शनच्या या सिनेमाचे शूटिंग येथील एका रिसॉर्टमध्ये करण्यात आले. रिसॉर्टमध्ये सिनेमातील स्वयंवराचे दृश्य चित्रीत करण्यात आले. या दृश्यात कपिल अभिनत्री एली अबराम दिसतायेत. कपिल आणि एली दोघेही वर-वधूच्या रुपात दिसले. हा सिनेमा अब्बास-मस्तान दिग्दर्शित करत आहेत. या सिनेमात दिग्दर्शक-अभिनेता अरबाज खान महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा शूटिंग सेटवर क्लिक झालेली कलाकारांची खास छायाचित्रे...