आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Johar And Sanjay Leela Bhansali's Fight Truth

करण-संजयच्या वादाचे सत्य समोर आले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतेच निरंजन आयंगरच्या ‘लूक हूज टॉकिंग’ शो मध्ये करण जोहरला संजय भन्साळीविषयी विचारण्यात आले तेव्हा त्याने सांगितले की, ‘संजय नकारात्मकता आणि अंधारात गुरफटले आहेत.’ करणच्या या कमेंटवर संजयने मौन बाळगले होते. मात्र सूत्रांनी सांगितले की, या दोघांच्या वादामध्ये संजयदेखील तितकाच दोषी आहे.
दोघांमध्ये वादाची पहिली ठिणगी फेब्रुवारी-मार्चमध्ये पडली. त्यावेळेस करणने दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहची ‘शुद्धी’ सिनेमासाठी निवड केली होती. ‘..रामलीला’नंतर करणचा हा सिनेमा फ्लोरवर येणार होता. संजयच्या ही गोष्ट लक्षात येताच त्याने रणवीरला धर्मा प्रॉडक्शन्सचा सिनेमा सोडून ‘बाजीराव मस्तानी’ करण्यास सांगितले. रणवीरने देखील संजय भन्साळींचे म्हणणे मान्य करुन ‘शुद्धी’ सिनेमा मध्येच सोडला. यामुळे करणला सिनेमासाठी नवीन जोडीचा शोध घ्यावा लागला. शिवाय त्याचे सर्व नियोजित शेड्यूल विस्कळीत झाले.
याचबरोबर भन्साळीने ‘बाजीराव मस्तानी’ची रिलीज डेट देखील २५ डिसेंबर २०१५ केली. ही डेट फेब्रुवारीमध्येच करणने ‘शुद्धी’साठी घोषित केली होती. या दोन सिनेमांची रिलीज डेट एकाच दिवशी येणे हा योगायोग मानला जाऊ शकत नाही. बॉलीवूडमध्ये सध्या या दोघांच्या वादाची चर्चा आहे.