आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धार्थ-वरुणसह 'राम लखन'चा रीमेक बनवणार करण जोहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करण जोहर सध्या 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घईंच्या जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर अभिनीत 'राम लखन'चा रिमेक बनवण्याची तयारी करत आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, डिंपल कपाडिया, राखी, अमरीश पुरी, परेश रावल आणि अनुपम खेर यांच्या भूमिका होत्या. भव्य सेट्स आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या मधुर संगीताने सजलेल्या या चित्रपटातील गाणी आजही घरगुती कार्यक्रमांमध्ये आणि डान्स शोमध्ये ऐकायला मिळतात. करणने यापूर्वी वडिलांच्या 'अग्निपथ'चा हृतिक रोशनसोबत यशस्वी रिमेक केला होता.
सध्या सुभाष घई यांच्याकडून चित्रपटाचे अधिकार खरेदी करण्यासाठी करणची कंपनी प्रयत्न करत आहे. घईंनी रिमेकच्या बदल्यात 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. मात्र, धर्मा प्रॉडक्शनने घईंना आठ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. दोन कोटींमुळे हा व्यवहार अडकेल, असे वाटत नाही.
सूत्रानुसार, घईंनी सांगितलेली रक्कम देऊन लवकरच करण 'राम लखन'चे रिमेक अधिकार खरेदी करणार आहे. या रिमेकमध्ये प्रमुख भूमिकेसाठी करणची रणबीर कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राला पसंती आहे. रामची भूमिका रणबीर तर लखनच्या भूमिकेत सिद्धार्थ दिसणार, असे वाटत होते. मात्र, ते आता शक्य नाही. कारण रणबीरची डेट डायरी 'जग्गा जासूस', 'रॉय' आणि 'तमाशा' या चित्रपटांनी भरलेली आहे. धर्मा प्रॉडक्शन्सने या रिमेकसाठी दिलेल्या शेड्यूलसाठी रणबीर आपले नियोजित शेड्यूल बदलू इच्छित नाही. त्यामुळे करणने आपल्या स्टुडेंट्सलाच रिमेकसाठी परफेक्ट मानले आहे. ट्रेडशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, जॅकीच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ मल्होत्राचे नाव निश्चित करण्यात आले असून अनिल कपूरची भूमिका आता वरुण धवन साकारणार आहे. रिमेकमध्ये अभिनेत्रींच्या बाबतीत अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही.