आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Johar Ready To Make Films With Competitants

NEW TREND: विरोधकांशी हात मिळवून सिनेमे बनवणार करण जोहर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये स्विझरलँड, शिफॉन आणि करवाचौथच्या ट्रेडमार्कसह सिनेमे बनणारा करण जोहर सिनेमा प्रॉडक्शनमध्येसुध्दा नवीन ट्रेड आणणार आहे. 'हंसी तो फंसी'सोबत केलेल्या प्रयोगाला धर्मा प्रॉडक्शनला '2 स्टेट्स'सह स्थापित करत असून आणखी सिनेमांसोबत पुढे नेण्याचा विचार करत आहे. सिनेमा इंडस्ट्रीमध्ये दोन स्वतंत्र्य, स्थापित आणि मोठे निर्माते एकत्र कधीच सिनेमा बनत नाहीत. परंतु '2 स्टेट्स' याला मात्र अपवाद ठरला आहे.
चेतन भगत यांच्या '2 स्टेट्स' या कादंबरीवर आधारित या सिनेमाचे अधिकार साजिद नाडियाडवाला यांच्याकडे आहेत. त्यांना शाहरुख खान आणि रणबीर कपूर यांना घेऊन हा सिनेमा बनवण्याची इच्छा होती. परंतु ते होऊ शकले नाही. एकिकडे करण जोहरचा सहाय्यक अभिषेक वर्मनने त्याची पटकथा लिहीली. बॉलिवूडमध्ये 70च्या दशकात कला दिग्दर्शक राहिलेले आर. वर्मन यांचा मुलगा अभिषेक वर्मनवर विश्वास ठेऊन करणने सिनमाचे अधिकार त्याच्याकडे देण्याविषयी साजिद नाडियाडवाला यांना सांगितले. साजिद यांनी सिनेमाचे अधिकार विकण्यास नकार दिला मात्र त्या पटकथेवर सिनेमा बनवण्यास होकार दिला.
या संयुक्त उपक्रमात इतर कुणाला घेण्यापेक्षा करणने आपल्या 'स्टुडेंट...'च्या आलियाला साइन केले. जवळपास सर्व निर्णय एकत्र घेण्यात आले. जर सिनेमाला यश मिळाले तर हे दोन्ही निर्माता इंडस्ट्रीमध्ये नवीन ट्रेंड आणतील हे मात्र नक्की. करणने असेच एकत्र निर्णय घेऊन काही सिनेमे भविष्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये एकता कपूरच्या बालाजी फिल्म्स बॅनरखाली त्याचा एक सिनेमा तयार होत आहे (नाव अद्याप ठरलेले नाहीये). अलीकडेच त्यांनी इमरान हाशमी आणि करीना कपूर यांना घेऊन सिनेमा बनवण्याची घोषणा केली होती परंतु ते होऊ शकले नाही.
अक्षय कुमार आणि अश्विनी यार्डीची कंपनी ग्रेझिंग गोट्ससोबत मिळूनसुध्दा करण एक दाक्षिणात्य सिनेमाच्या रिमेकवर लवकरच काम करण्यास सुरूवात करणार आहे. त्याने यापूर्वी अनेक ट्रेंड बॉलिवूडमध्ये स्थापित केले असून आता पुन्हा आणखी एक नवीन ट्रेंड स्थिपात करण्याच्या मार्गावर आहे. निर्माता-दिग्दर्शक आणि अभिनेता करण जोहर आता इतर निर्माते आणि बॅनरसह अनेक सिनेमे बनणार आहे. अशी भागीदारी पहिले फक्त हॉलिवूड इंडस्ट्रीमध्येच दिसून येत होती.