(कॉफी विथ करणच्या सेटवर सलमान खान)
मुंबई - बॉलिवूडमध्ये अफवा अगदी वार्यासारख्या पसरतात हे अनेकदा लक्षात आले आहे. यंदाही अशाच एका अफवेला पेव फुटले आहे. ही अफवा आहे करण जोहरबद्दलची. करण जोहरने त्याचा चित्रपट 'शुद्धी'मध्ये काम करण्यासाठी 'डेविल' सलमान खानला आणि अजून एका चित्रपटासाठी मि. परफेक्शनिस्ट
आमीर खानला 150-150 कोटी रुपये मानधन दिल्याची चर्चा आहे. मात्र करणने या सर्व आफवा खोट्या असल्याचे ट्वीटरवरून सांगितले आहे.
करणने गुरूवारी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटवरवर लिहिले की, "मी बॉलिवूडच्या दोन आघाडीच्या अभिनेत्यांना 300 कोटी रुपये दिले आहे. मात्र जर ही गोष्ट खरी असेल तर मीही नोकरीच्या शोधात ाहे" अशा शब्दात त्याने या अफवेची टर उडवली.
'शुध्दी' या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा हे करत आहेत. मल्होत्रा यांनी यापूर्वी हृतिक रोशन स्टारर 'अग्निपथ' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात मल्होत्रांच्या कामाची चांगलीच चर्चा झाली. तर करणच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात येणार्या अजून एक चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नाही. मात्र या चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिकेत असणार आहे.