आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karan Johar's First Look In Upcoming Film Bombay Velvet Is Out

FIRST LOOK: 'बॉम्बे वेल्वेट'मध्ये असा दिसणार करण जोहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- करण जोहर)
मुंबई- 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमात अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर एंट्री करणारा निर्माता करण जोहर आपल्या चाहत्यांना पुन्हा एकदा एक सरप्राइज देणार आहे. सुरुवातीला त्याने 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (1995)मध्ये सकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच आता तो आगामी सिनेमात नकारात्मक भूमिका साकारत आहे.
अनुराग कश्यपच्या 'बॉम्बे वेल्वेट' सिनेमात करण कैजाद खंबाटाचे पात्र साकारणार आहे. करण 'बॉम्बे वेल्वेट'मध्ये जॉनी बलराज (रणबीर कपूर)चा शत्रू असणार आहे. बातम्यांनुसार, करण सिनेमांत आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीसाठी काहीही करण्याची तयारी ठेवणारी व्यक्तीरेखा साकारत आहे.
करण जोहरने टि्वटरवर आपला लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये करण वाढलेली मिशी आणि हातात ग्लास घेऊन दिसत आहे. फोटो शेअर करून त्याने लिहिले, 'अनुराग कश्यपच्या बॉम्बे वेल्वेटचा खलनायक, कैजाद खंबाटाचे पात्र मी साकारत आहे.'
सिनेमात करणशिवाय अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूरसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर आणि अनुष्काच्या लूकला रिलीज करण्यात आले होते.
'बॉम्बे वेलवेट'मध्ये करण पहिल्यांदा खलनायकाची भूमिका साकारत आहे. इतर दोन्ही पात्रांप्रमाणेच करणचा लूकसुध्दा वेगळा दिसून येतोय. करणने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे निर्मित आणि दिग्दर्शित केले आहेत. करण आता सिनेमा तयार करण्यासोबतच अभिनयाच्या मार्गावर चालत आहे. आता करणचा ही नकारात्मक भूमिका लोकांना कितीतप पसंत पडते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील इतर स्टारकास्टचा वेगळा लूक आणि पोस्टर...