आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor And Imran Hashmi At Ajmer Sharif Dargah

निकाहनंतर पहिल्यांदाच अजमेर शरीफला पोहोचली करीना, इमरान हाश्मीनेसुद्धा चढवली चादर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अजमेर शरीफच्या दर्ग्यात करीना कपूर)

अजमेर - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सोमवारी अजमेरला पोहोचली होती. येथे तिने सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात मखमली चादर चढवली. सैफ अली खानसह निकाह झाल्यानंतर करीना पहिल्यांदाच अजमेर शरीफच्या दर्ग्यात आली होती. अलीकडेच रिलीज झालेल्या 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे आनंदीत असलेल्या करीनाने येथे प्रार्थना केली. लग्नानंतरचा हिट झालेला करीनाचा हा पहिलाच सिनेमा आहे. लग्नापूर्वी अनेकदा ती येथे आली आहे. यावेळी करीनाची एक झलक बघण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
करीनाशिवाय अभिनेता इमरान हाश्मीनेसुद्धा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात चादर चढवून आपल्या आगामी 'राजा नटवरलाल' या सिनेमाच्या यशासाठी प्रार्थना केली. जयपूरमध्ये इमरान 'राजा नटवरलाल'च्या प्रमोशनसाठी आला होता. सिनेमाचे प्रमोशन केल्यानंतर तो येथे प्रार्थना करायला पोहोचला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या दोन्ही स्टार्सची अजमेर येथे क्लिक झालेली छायाचित्रे..