आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणबीर कपूरचा बहुप्रतिक्षित 'बर्फी' चित्रपट 14 सप्टेंबरला रिलीज होणार आहे, तर एका आठवड्यानंतर 21 सप्टेंबरला बहीण करिना कपूरचा मेगाबजट 'हिरॉईन' रिलीज होणार आहे. याच दिवशी करिना कपूरचा वाढदिवस देखील आहे. तशी तर ही टक्कर नाही पण जाणकारांच्या मते दोन्ही चित्रपटांचा बिझनेस प्रभावित होईल. दोन्ही कलाकार एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे त्यांच्या टर्म्सवर काही फरक पडणार नाही पण दोघांचे चित्रपट एका मागे एक येत असल्याने ते नाराज आहेत. असे एका जाणकराचे म्हणणे आहे. 'बर्फी' चित्रपटाची तारीख तीन वेळेस बदलण्यात आली होती. पुन्हा एकदा बदलली असती तर चित्रपटावर नकारात्मक प्रभाव झाला असता असे एका जाणकारांचे मत आहे. दोन्ही चित्रपटाचे चित्रीकरण देखील अनेकदा टाळण्यात आले आणि रिलीज डेट देखील बदलण्यात आली. हा एक योगायोग म्हणावा लागेल असेही तो म्हणाला. 'हिरॉईन' आधी 14 सप्टेंबरला येणार होता नंतर त्याची 21 तारीख करण्यात आली. 'बर्फी' तर जुलैमध्येच बॉक्स ऑफिसवर येणार होता. पण दीपिकाच्या 'कॉकटेल' बरोबर टक्कर होईल म्हणून तारीख 31 जुलै ठेवण्यात आली. ही तारीख सुद्धा अक्षय कुमारच्या 'जोकर'साठी बुक होती. त्यामुळे 'बफीचा' मुहूर्त 14 सप्टेंबरला निघाला. आता अनुराग कश्यप आणि मधुर भांडारकर तारीख बदलण्याच्या विचारात नाहीत. कपूर वर्सेस कपूरच्या टक्करला आता कोणीच थांबवू शकत नाही.
लग्नात करीना परिधान करणार सासूबाई शर्मिलाचा शरारा
PHOTOS : करीना कपूरचा नवा झीरो साईज अंदाज
ऑक्टोबरमध्ये करीना होणार छोट्या नवाबाची बेगम!
कान्समध्ये 'हिरॉईन' बनून ऐश्वर्याला मात देणार करीना
मुज-यानंतर आता करीना दाखवणार 'हलकट जवानी'वर जलवा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.