आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor And Varun Dhawan Walk On Ramp At Lakme Fashion Week

LFW 2014: रॅम्पवर करीनाने दाखवला फॅशनचा जलवा, वरुणनेही केला रॅम्पवॉक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - रॅम्पवर वरुण धवन, करीना कपूर आणि मनीष मल्होत्रा)
मुंबई - लॅक्मे फॅशन वीक 2014 या इव्हेंटच्या शेवटच्या दिवशी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री करीना कपूर रॅम्पवर अवतरली होती. मनीष मल्होत्राने तिच्यासाठी खास ड्रेस डिझाइन केला होता.
करीनाने मेटॅलिक पर्पल कलरचा लहेंगा परिधान करुन रॅम्पवर कॅटवॉक केला. या लहेंग्यासह तिने डायमंड ज्वेलरी घातली होती. यावेळी करीना म्हणाली, ''मनीष मल्होत्राच्या ड्रेसमध्ये मला कम्फर्टेबल वाटतं. माझ्या मते फिल्म इंडस्ट्रीसाठी मनीष एक गिफ्ट आहे.''
शेवटच्या दिवशी करीनासह बॉलिवूडचा यंगस्टार वरुण धवनसुद्धा रॅम्पवर अवतरला होता. यावेळी त्याने ब्लॅक शर्ट-पँट आणि ब्लेजर घातला होता. मंगळवारी सुरु झालेला लॅक्मे फॅशन वीकच्या इव्हेंटची रविवारी सांगता झाली.
पुढे पाहा, करीना आणि वरुणची या इव्हेंटमध्ये क्लिक झालेली छायाचित्रे...