आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 'रिफ्यूजी', 'हीरोइन', 'सिंघम रिटर्न्स', छायाचित्रांत पाहा करीनाचा बदलता लूक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूरची पहिले छायाचित्र 'रिफ्यूज' सिनेमामधील आणि दुसरे 'डॉन' सिनेमाचे.
मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत 'रिफ्यूज' (2000) सिनेमातून एंट्री करणारी बेगम करीना कपूर खान आज 34 वर्षांची झाली आहे. बॉलिवूडमध्ये बेगम नावाने प्रसिध्द करीनाचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबई येथे अभिनेता रणधीर कपूर यांच्या घरी झाला. अभिनेत्री करिश्मा कपूर तिची मोठी बहीण आहे. 14 वर्षांच्या करिअरमध्ये करीनाने अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये 'कभी खुशी कभी गम', 'गोलमाल 3', 'जब वी मेट', 'बॉडीगार्ड', '3 इडियट्स', 'हिरोइन', 'सिंघम रिटर्न्स'सारख्या सुपरहिट सिनेमांत करीना झळकली आहे.
अभिषेकसह सुरु केले फिल्म करिअर
करीनाने बॉलिवूडमध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसह पदार्पण केले. 2000मध्ये रिलीज झालेल्या ''रिफ्यूज' सिनेममध्ये करीना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर दिसली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र करीनाच्या प्रवासाने वेग धरला. करीनाने 2000पासून 2014पर्यंत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. तिने बॉलिवूडच्या सर्व सुपरस्टार्ससह काम केले आहे. करीना एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, हे तिने पदार्पणाच्या सिनेमासाठी फिल्म फेअर अवॉर्ड जिंकूनच सिध्द केले होते. तिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये जवळपास सहा फिल्म फेअर अवॉर्ड जिंकले आहेत.
अभिनयामुळे नावी केलेत अनेक पुरस्कार
अनेक फिल्म फेअर पुरस्कार नावी करणा-या करीनाने सिने-अवॉर्ड, स्टारडस्ट अवॉर्ड, ग्लोबल फिल्म इंडियन अवॉर्ड बॉलिवूड मूव्ही अवॉर्ड, बिग स्टार एंटरटेमेन्ट अवॉर्ड, अप्सरा फिल्मन अँड टेलिव्हजिन प्रोड्यूसर्स अवॉर्ड्स, इंडियन फिल्म अॅकॅडमी अवॉर्ड्स, स्क्रिन अवॉर्ड्ससह इतर पुरस्कारही आपल्या नावी केले आहेत.
झिरो फिगरने मिळवली लोकप्रियता
करीनाने बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड सुरु केला. तिने स्वत: फिट ठेवले आहे. कधीच लठ्ठ दिसत नसली तरी करीना सतत योग आणि डाएट करून स्वत:च्या वजनाला कंट्रोल करत असते. फिटनेसमुळेच लग्नानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत घट झालेली नाहीये. करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केले. लग्नानंतरही लोकांच्या मनावर राज्य करणा-या अभिनेत्रींमध्ये करीनाचे नाव सामील आहे. तिचा लास्ट रिलीज 'सिंघम रिटर्न्स' होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमात तिच्या सोबत अजय देवगण दिसला.
करीनाच्या बर्थडे निमित्त आम्ही तुम्हाला तिची काही छायाचित्रे दाखवत आहोत...पुढील
स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाच्या विविध लूकची छायाचित्रे...