आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Instagramवर नेहमी अॅक्टिव असते करीना कपूर-खान, पाहा Different Looks

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीना कपूर खानच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेली छायाचित्रे)
मुंबईः बॉलिवूडमध्ये 2000मध्ये एका अशा अभिनेत्रीने पदार्पण केले, जी बघता-बघता येथील आघाडीची अभिनेत्री ठरली. तिचा पदार्पणातला पहिला सिनेमा भलेही फ्लॉप ठरला, मात्र या अभिनेत्रीचे अभिनयाच्या बळावर अल्पावधीतच असंख्य चाहते निर्माण झाले. होय, आम्ही बोलतोय ते रेफ्यूजी या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पाऊल ठेवणा-या करीना कपूर खान हिच्याविषयी.
21 सप्टेंबर 2014 रोजी करीना वयाची 34 वर्षे पूर्ण करणार आहे. 14 वर्षांपूर्वी करीनाने अभिषेक बच्चनसोबत रेफ्युजी या सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. जसजसे करीनाचे करिअर पुढे जाऊ लागले, तसतशी तिच्या यशस्वी सिनेमांची संख्या वाढू लागली. 'कभी खुशी कभी गम', 'जब वी मेट', 'गोलमाल 3', 'बॉडीगार्ड', 'हीरोइन', '3 इडियट्स', 'सिंघम रिटर्न्स' यासह बरेच हिट सिनेमे करीनाच्या नावी जमा आहेत. बॉलिवूडमध्ये करीनाने जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. शिवाय करिअरमध्ये तिने सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड्सह ब-याच अवॉर्ड्सवर आपली मोहोर उमटवली.
सैफ अली खानची बेगम आहे करीना...
करीनाचे लग्न बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत झाले आहे. या जोडीला सैफीना नावाने ओळखले जाते. दोघांनी पाच वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले. टशन या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान या दोघांचेल सूत जुळले होते. खासगी आयुष्यातील ही लोकप्रिय जोडी प‍डद्यावर मात्र आपली छाप सोडू शकलेली नाहीये.
इंस्टाग्रामवर अॅक्टिव आहे करीना...
करीना सोशल नेटवर्किंग साइट्सवर नेहमी सक्रिय असते. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची बरीच छायाचित्रे अपलोड केली आहेत. यापैकी काही छायाचित्रांमध्ये ती तिचा पती सैफ अली खानसोबत दिसते. करीना आपल्या आयुष्यातील अनेक क्षण कॅमे-यात कैद करत असते. इंस्टाग्रामवर उपलब्ध असेलल्या छायाचित्रांमध्ये करीना वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसत आहे. काही छायाचित्रांत ती ग्लॅमरस लूकमध्ये तर काहींमध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत आहे.
करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आम्ही तिची काही निवडक छायाचित्रांचे घेतली आहेत. यामध्ये तिच्या वेगवेगळ्या लूक्ससोबतचे तिचा हटके अंदाजसुद्धा दिसत आहे. पुढील स्लाईड्समध्ये पाहा ही खास छायाचित्रे...