आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor Joins The List Of Actors Who Ride An Autorickshaw In Their Movies

बॉलिवूड चित्रपटांत ऑटो रिक्षांचा भाव वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्य माणसाच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे ऑटो रिक्षा. शहरांमध्ये या रिक्षाला तर अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ही ऑटो रिक्षा बॉलिवूडमध्ये हिट होत आहे. अंदाजे 25 वर्षांपूर्वी केतन मेहताच्या 'हीरो हिरालाल'मध्ये नसिरुद्दीन शाहने रिक्षावाल्याची भूमिका साकारली होती.
त्यानंतर चित्रपटात क्वचितच रिक्षाचे दर्शन झाले. मात्र, आता ही रिक्षा एखाद्या खास सिक्वेंससह चित्रपटात सादर केली जात आहे. 'धूम-3'मध्ये अभिषेक बच्चनचा प्रवेशच रिक्षामधून होतो. कार आणि बाइक्सचा खेळ असलेल्या या चित्रपटात रिक्षाची दृश्ये असणे हे तिचे महत्त्व दर्शवते. दुसरीकडे गोव्यामध्ये 'सिंघम रिटर्न्‍स'च्या शूटिंगदरम्यान करूना रिक्षा चालवताना दिसली. यासह ती रिक्षा चालवणार्‍या बॉलिवूड स्टार्सच्या यादीत समाविष्ट झाली आहे.
याबाबत करूनाने सांगितले की, 'रिक्षा चालवताना मला खूप मजा आली. मी याअगोदर रिक्षा चालवली नव्हती. त्यामुळे मला रिक्षा चालवल्याने व ती मला चालवता आल्याने आनंद झाला आहे.'