आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 छायाचित्रांमध्ये पाहा, करीनाचा Instagramवरील दिलखेचक अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील छायाचित्र - पती सैफ अली खानसह करीना)
मुंबई - गेल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला 'सिंघम रिटर्न्स' हा सिनेमा तिकिट बारीवर चांगली कमाई करत आहे. रिलीजच्या केवळ दोन दिवसांतच या सिनेमाने 50 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. यावर्षी रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये ओपनिंग डेच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला आहे. सिनेमाला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे अजय देवगण आणि करीना कपूर खूप आनंदी आहेत. करीनाचे मागील सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. त्यामुळे या सिनेमाचे यश तिच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सिनेमामुळे ब-याच दिवसांनी करीनाला यशाची चव चाखायला मिळाली आहे.
सिनेमाच्या चांगल्या सुरुवातीसोबतच करीनासाठी अलीकडेच आणखी एक आनंदाच कारण होते. ते म्हणजे पती सैफ अली खानचा वाढदिवस. 15 ऑगस्टला तिचा सिनेमा रिलीज झाला आणि दुस-या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला तिच्या हबीचा वाढदिवस होता. करीना सैफची दुसरी पत्नी आहे. या कपलला सैफिना नावाने ओळखले जाते. करीनाचे सैफवर जीवापाड प्रेम आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सैफसोबतची अनेक छायाचित्रे अपलोड केली आहेत. या छायाचित्रांमध्ये त्यांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळते. सैफसोबतचे खास क्षण ती कॅमे-यात कैद करत असते.
इंस्टाग्रामवर करीनाची वेगवेगळ्या लूक्सचीदेखील छायाचित्रे बघायला मिळतात. या छायाचित्रांमधये ती खूप ग्लॅमरस दिसत आहे. तर काही छायाचित्रांमध्ये तिचा ट्रेडिशनल लूकसुद्धा बघायला मिळतोय. करीनाने स्वतःची बरीच छायाचित्रे कोलाजच्या रुपात अपलोड केली आहेत.
करीनाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आम्ही काही निवडक छायाचित्रे घेतली आहे. या छायाचित्रांमध्ये तिचा दिलखेचक अंदाज बघायला मिळतोय. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्ही करीनाची ही खास छायाचित्रे बघू शकता...