आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना होणार सुजॉयची 'रिव्हॉल्व्हर राणी सिंह'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालन कपूर आणि कंगना रनोटच्या नकारानंतर सुजॉय घोषने आपल्या आगामी चित्रपटासाठी करीनाला संपर्क केला आहे. तो लवकरच गोव्यात करीनाची भेट घेणार आहे. करीना गोव्यात 'सिंघम रिटर्न्‍स'चे शूटिंग करत आहे. दोघांनी सध्या याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, सूत्रांच्या खात्रीलायक वृत्तानुसार 'दुर्गा राणी सिंह'मध्ये करीनाचे स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. फक्त कागदोपत्री औपचारिकता पूर्ण करणे बाकी आहे.
आपली आवडती अभिनेत्री विद्या बालनने आपल्याच चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे, यावर अद्यापही सुजॉय घोषला विश्वास नाही. सुजॉयने 'कहानी'चित्रपटाची कथा विद्याला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती आणि ती हिटही ठरली. त्यानंतर पोलिस अधिकारी दुर्गा राणी सिंहवर आधारित असलेल्या चित्रपटाची कथादेखील त्याने विद्यासाठी लिहिली. मात्र, या चित्रपटासाठी विद्याने नकार दिला आहे. विद्याच्या या धक्कादायक निर्णयातून सावरत सुजॉयने क्वीन कंगनाशी संपर्क साधला. सुरुवातीला कंगनाने चित्रपटात आपला रस दाखवला, नंतर डेट्स बुक असल्याचे कारण पुढे करत तिनेदेखील चित्रपटातून अंग काढून घेतले आहे.
सूत्रांनी सांगितले की, 'दुर्गा राणी सिंह'चे केलिमपाँगमध्ये करण्यात येणारे शूटिंग शेड्यूल सुजॉयने विद्यासाठी खूप बारकाईने आखले होते. मात्र, आता कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने त्याने करीना कपूरशी संपर्क केला आहे. करीनाने 'कहानी'च्या यशानंतर सुजॉय घोषसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, दोन अभिनेत्रींनी नकार दिलेला चित्रपट आपण केला तर यातून कोणता संदेश जाईल, या चिंतेने करीनाला ग्रासले आहे. शिवाय तिला चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत. सुजॉय आणि करीना यांच्यात या चित्रपटाबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जात असल्याचे म्हटले जात आहे.