आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'राम लखन'मध्ये करीना कपूर?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः करीना कपूर)

रोहित शेट्टी मैत्री आणि प्रामाणिकपणाला कामाच्या बरोबरीने महत्त्व देतो. आजपर्यंत त्याने अजय देवगणसोबत जास्त चित्रपट बनवले आहेत. गेल्या वर्षी शाहरुखसोबत 'चेन्नई एक्स्प्रेस' बनवला आणि आता 'राम लखन'च्या रिमेकवर काम सुरू करणार आहे. यामध्ये अभिनेत्रीची निवड करण्याचे अद्याप बाकी आहे. साहजिकच तो यासाठी नवोदित अभिनेत्रीऐवजी आपल्या आवडत्या अभिनेत्रीला संधी देईल. म्हणजेच 'राम लखन'च्या रिमेकमध्ये करीना कपूरच्या समावेशाची शक्यता आहे. यापूर्वी करीनाने रोहित शेट्टीच्या (गोलमाल रिटर्न्स, गोलमाल-३, सिंघम रिटर्न्स) तीन चित्रपटांमध्ये काम केले आहे.
शाहरुखसोबतच्या चित्रपटाचा शेवट केल्यानंतर रोहित शेट्टी सध्या करण जोहरच्या बॅनरसाठी 'राम लखन'च्या रिमेकवर काम सुरू करणार आहे. करीना करणचीही आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे या चित्रपटात तिच्या निवडीची शक्यता वाढली आहे. लवकरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे दिसते.