आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्क करीनासाठी बिकनी ठरली अपशकुनी !!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'टशन' चित्रपटात बिकनी घालण्यासाठी करीनाने प्रचंड मेहनत घेऊन झिरो साईज फिगर केली होती. मात्र आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे मधुर भांडारकरच्या आगामी 'हिरॉईन' चित्रपटाच करीनाने बिकनीला चक्क नो म्हटले आहे. करीनाने बिकनीला चक्क बायबाय केल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
'हिरॉईन' या चित्रपटातल्या 'मैं हू हिरॉईन' या साँग ट्रॅकमध्ये बिकनी घालावी अशी मधुरची इच्छा होती. मात्र करीनाने बिकनी घालायला नकार दिला.
आता बिकनी न घालण्याच्या निर्णयामागे काय कारण आहे हे जाणून घ्यायची तुमची इच्छा असेल ना. चला तर मग करीना असे का करत आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो.याआधी 'टशन' आणि 'कमबख्त इश्क' या चित्रपटात करीना बिकनीमध्ये दिसली होती. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणाणून आपटले. त्यामुळे बिकनी अपशकुनी असल्याचे करीनाला वाटत आहे. 'हिरॉईन' चित्रपट हिट व्हावा अशी करीनाची इच्छा आहे. आता बिकनी परिधान केल्यास याही चित्रपटाची स्थिती 'टशन' आणि 'कमबख्त इश्क'सारखी होईल अशी भीती करीनाला वाटत आहे. करीनाला 'हिरॉईन' हा चित्रपट तिच्या करिअरसाठी खूपच महत्त्वाचा वाटत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची करीनाची इच्छा नाही.
पाहिलतं ना, करीना 'हिरॉईन' चित्रपटाला घेऊन किती सेंसिटीव आहे ते. विशेष म्हणजे करीनाचा हा निर्णय मधुरनेही मान्य केला आहे.
लग्नात करीना परिधान करणार सासूबाई शर्मिलाचा शरारा
PHOTOS : करीना कपूरचा नवा झीरो साईज अंदाज
ऑक्टोबरमध्ये करीना होणार छोट्या नवाबाची बेगम!
मुज-यानंतर आता करीना दाखवणार 'हलकट जवानी'वर जलवा