आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिनेमात पदार्पणापूर्वी खूप लठ्ठ होती करीना, PIXमध्ये पाहा बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आज इंडस्ट्रीतील फॅशन आयकॉन आहे. मात्र पूर्वीपासूनच
करीनाची फिगर अशी नव्हती. सिनेमात पदार्पण करण्यापूर्वी आणि आपल्या शालेय जीवनात करीना खूप लठ्ठ होती. 21 सप्टेंबर रोजी करीना वयाची 34 वर्षे पूर्ण करत आहे.
करीनाने 2000 मध्ये रेफ्युजी या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील करीनाचे लूक्स आजच्या तुलनेत खूप वेगळे होते. त्यावेळी तिचे वजनसुद्धा खूप होते. मात्र 'टशन' या सिनेमाच्यावेळी करीनाने झिरो फिगरचा ट्रेंड बॉलिवूडमध्ये आणला. त्यावेळी भारतात झिरो फिगर कोणत्याही अभिनेत्रीची नव्हती. करीनानेच पहिल्यांदा भारतात हा ट्रेंड आणला. 'टशन'मध्ये करीनाची झिरो फिगरमुळे बरीच चर्चा झाली होती.
डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमधून घेतले शालेय शिक्षण...
करीना कपूरने जमनाबाई नर्सी स्कूल मुंबईतून सुरुवाताची शिक्षण घेतले. त्यानंतर डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते, की शालेय जीवनात तिला जेव्हाही सुटी मिळायची, तेव्हा मुंबईत परतून ती आपल्या बहिणीच्या सिनेमांच्या सेटवर जायची. सिनेमांमध्ये असेलल्या रुचीचा परिणाम आपल्या शिक्षणावर पडला असल्याचेही करीनाने म्हटले होते. रंजक गोष्ट म्हणजे, कॉलेजमध्ये अभिनेता चंद्रचूड सिंग करीनाचा म्युझिक टीचर होता.
करीनाने 'गोलमाल सीरीज', 'ओमकारा', 'हीरोइन', 'थ्री इडियट्स', 'जब वी मेट', 'चमेली' 'बॉडीगार्ड' आणि 'सिंघम रिटर्न्स' यांसारख्या सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला करीनाचा बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करीना कपूरची निवडक छायाचित्रे...