आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छम्मक छल्लो' करीना आता होणार 'दबंग'ची 'मुन्नी' !!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'रा वन'मध्ये छम्मक छल्लो आणि 'एजंट विनोद'मध्ये मुजरा केल्यानंतर करीना कपूर आपल्या डान्स नंबरने सगळ्यांचीच हॉट फेवरेट बनली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, 'दबंग २' या सिनेमासाठी आता सलमानने करीनाला 'मुन्नी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
'एजंट विनोद'मध्ये मुजरा सादर करणा-या करीनाला सगळ्यांचीच प्रशंसा मिळत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता 'दबंग २'च्या निर्मात्यांनी सिनेमातल्या आयटम नंबरसाठी करीनाची निवड केली आहे.
सध्या करीनाने ही ऑफर स्विकारली की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र करीनाने सलमानबरोबर नुकताच 'बॉडीगार्ड' हा हिट सिनेमा दिला आहे. त्यामुळे ती सलमानची ऑफर नाकारणार नाही असं दिसत चित्र आहे.
'दबंग'च्या सिक्वेलमध्ये सलमानने ब-याच नवीन गोष्टी केल्या आहेत. एक तर म्हणजे 'दबंग'चा दिग्दर्शक बदलला, व्हिलनही आता नवीन आहे आणि आता मुन्नीही बदलत आहे.
चला तर मग करीनाला 'मुन्नी'च्या रुपात पाहायला मिळणार का याची प्रतिक्षा करुया.
५० कोटीत विकल्या गेले 'दबंग टू'चे हक्क
दबंग-2 मध्ये प्रकाश राज व्हिलन