आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजयच्या स्मोकिंगच्या सवयीने करीना त्रस्त, सेटवर जेवत नाही सोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणचा स्वभाव करीना कपूरला खूप आवडतो. म्हणून दोघे गेल्या वीस वर्षांपासून मैत्री निभावत आहेत. प्रत्येक संकटकाळी म्हणतात, 'सब अच्छा होगा, कुछ बुरा नही होगा'
करीना त्याच्या कुटुंबीयांना भेटते-बोलते, परंतु अजयसह जेवण करण्याच्या गोष्टीला टाळते. त्याचे कारण म्हणजे, अजयची धूम्रपानाची सवय.
करीना सांगते, 'अजयच्या धूम्रापानाची सवय सर्व इंडस्ट्रीला ठाऊक आहे. 'सिंघम रिटर्न्स'च्या शुटिंगदरम्यानसुध्दा मला त्याचा सवयीचा सामना करावा लागला. एकदा मी जेवण करत होते तेव्हा अजय माझ्या मागे सिगारेट ओढत उभा होता. मी कसेतरी जेवण पूर्ण केले तरी तो सिगारेट ओढतच होता. तेव्हा मी त्याला म्हणाले, पुढच्या वेळेस जेवताना सिगारेट ओढली तर मी तिथून निघून जाईल.'
अजयने करीनाला शब्द दिला, की पुढच्या वेळेस असे होणार नाही. लंचवेळी तो सिगारेट ओढणार नाही. एकदा त्याने त्याचे पालन केले मात्र करीना अद्याप त्याच्याबद्दल निश्चित नाहीये.