आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor’S Special Preparations For Udta Punjab

उडता पंजाब'मध्ये करीना पंजाबी कुडी, गिरवतेय पंजाबी भाषेचे धडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीना कपूर सध्या 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगमध्ये व्यग्र असून फेब्रुवारीपर्यंत या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होणार आहे. यानंतर करीना अभिषेक चौबे यांच्या दिग्दर्शनामधील 'उडता पंजाब'च्या शूटिंगला मार्चपासून सुरुवात करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाची तयारी करीनाने आतापासूनच सुरू केली आहे.
'उडता पंजाब'मध्ये करीनाची एका पंजाबी मुलीची भूमिका आहे. चित्रपटातील अनेक संवाद पंजाबी भाषेतच आहेत. त्यामुळे पंजाबी भाषा शिकण्यासाठी करीना कपूर प्रयत्न करत असून तिने यासाठी १० दिवसांचा ट्रेनिंग कोर्सदेखील पूर्ण केला आहे. आतापर्यंत अनेक चित्रपटांत पंजाबी मुलीची भूमिका साकारली असतानादेखील करीनाला पंजाबी भाषा येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जवळच्या लोकांसोबत या भाषेमध्ये करिनाला कधी संवाद साधता आला नाही. त्यामुळे या भाषेत बोलण्यास करिनाला अनेक अडचणी आल्या.
अभिषेक चौबेंच्या चित्रपटातील भूमिकेसाठी कलाकारांना भाषेवर अधिक भर द्यावा लागतो. विद्या बालन आणि माधुरी दीक्षितला चौबेंचे चित्रपट करत असताना याचा अनुभव आलेला आहे. आता चित्रपटाच्या निमित्ताने का होईना करीना पंजाबी भाषेत बोलणार आहे.