आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena, Malaika, Karan, Jacqueline At Zoya Akhtar's Bday

जोयाच्या पार्टीत पोहोचले करण जोहर, गौरी, जॅकलिन, करीनाचा दिसला ग्लॅमरस Look

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: गौरी खान, मलायका अरोरा खान आणि करीना कपूर खान)
मुंबईः करीना कपूर खान, जॅकलिन फर्नांडिस, करण जोहर, मलायका अरोरा खानसह बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी दिग्दर्शिका जोया अख्तरच्या घरी जमले होते. जोयाने आपल्या वांद्रास्थित राहत्या घरी सोमवारी ही छोटेखानी पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत करीनाचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. मलायका आणि अमृता अरोरासोबत करीना पार्टीत सहभागी झाली होती. जॅकलिन फर्नांडिस आणि करण जोहर या पार्टीत एकत्र पोहोचले. याशिवाय सीमा खान, अनू दीवान, महीप कपूर, भावना पांडे या सेलिब्रिटींनीसुद्धा जोयाची पार्टी एन्जॉय केली. शाहरुख खानची पत्नी गौरी खानसद्धा या पार्टीत सहभागी झाली होती.
या स्टार्सची एक झलक बघण्यासाठी जोयाच्या 'सी स्प्रिंग बंगलो'च्या बाहेर फॅन्स आणि मीडियाची गर्दी जमली होती. जोया सध्या 'दिल धडकने दो' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. यापूर्वी तिने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जोयाच्या पार्टीत जमलेली सेलिब्रिटींची मांदियाळी...