समयरा, कियान आणि करिश्मा कपूर
मुंबई: 90च्या दशकात 'राजा बाबू', 'जिगर' 'सुहाग', 'कुली नं. 1', 'गोपी किशन', 'साजन चले ससुराल', 'जीत' आणि 'राजा हिंदूस्तानी'सारख्या सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये यशस्वी ओळख निर्माण करणारी करिश्मा कपूर अर्थातच 'लोलो' आज (25 जून) 40वा वाढदिवस साजरा करत आहे. तसे पाहता करिश्मासाठी मागील काही वर्षे खूप अडचणीचे होते. तरीदेखील ती आपली मुले 'समायरा' आणि 'कियान'सह आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती.
करिश्मा आणि तिचा पती संजय कपूर यांच्यातील वाढत्या दुराव्याने त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत गेले. त्यांनी यावर्षी कोर्टात एकमेकांपासून कायदेशिरित्या विभक्त होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. 2012मध्ये करिश्मा संजयपासून विभक्त होऊन दोन्ही मुलांना घेऊन मुंबईला आई-वडिलांच्या घरी राहण्यास आली होती. त्यानंतर दोन्ही मुले करिश्मासोबतच राहत आहे. मुलांच्या कस्टडीसाठी संजयने कोर्टात करिश्माच्या विरोधात अर्ज दाखल केला मात्र सामंजस्याने तोडगा काढून त्याने हा अर्ज आता मागे घेतला आहे. करिश्माने मुलांच्या प्रेमापोटी नवीन आयुष्याला सुरूवात केली. सध्या तिच्याकडे कोणताही सिनेमा नाहीये. परंतु अलीकडे ती आपल्या ग्लॅमरस लूकने माध्यमांमध्ये दिसायला लागली आहे. अनेकदा ती आपल्या मुलांसह वेळ घालवताना दिसते. तिच्यासह मावशी करीनासुध्दा मुलांसोबत आपला मौल्यवान वेळ घालवत असते.
समायरा आणि कियानचे संजयसुध्दा खूप लाड करतो. त्यामुळे 'फादर्स डे'च्या दिवशी करिश्मा-संजय दोघांना एकत्र येऊन मुलांसह वेळ घालवला. मुलांसह वेळ घालवलेल्या या क्षणांबद्दल संजयने टि्वटरवर पोस्ट केले होते. करिश्मा-संजयचे 29 जून 2013मध्ये लग्न झाले होते. हे संजयचे दुसरे तर करिश्माचे पहिले लग्न होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा करिश्माने मुलांसह घालवलेले काही अविस्मरणीय क्षण...