मुंबई - नव्वदच्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत आपला करिश्मा दाखवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर पुन्हा एकदा पब्लिक इवेंटमध्ये सातत्याने दिसू लागली आहे. अलीकडेच करिश्मा मुंबईतील ज्वेलरी शॉपच्या ओपनिंग इवेंटमध्ये पोहोचली होती.
गुलमोहर साउथ मुंबई नावाच्या या शॉपच्या ओपनिंगवेळी करिश्मा डिझायनर ड्रेसमध्ये दिसली. तिने व्हाइट सिल्व्हर कलरचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर स्लेटी कलरचे डिझायनर जॅकेट घातले होते. करिश्माचा हा लूक खूपच आकर्षक वाटला. या शॉपचे मालक गांधी कुटुंबियांनी करिश्मासोबत फोटो काढून घेतले. करिश्माने दीप प्रज्वलन करुन शॉपचे ओपनिंग केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगमध्ये पोहोचलेल्या करिश्मा कपूरची छायाचित्रे...