आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karisma, Sonakshi Attend A Special Screening Of '2 States'

'2 स्टेट्स'च्या स्क्रिनिंगमध्ये करिश्मा, सोनाक्षीसह पोहोचले स्टार्स, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अर्जुन कपूर आणि आलिया भट्ट स्टारर '2 स्टेट्स' हा सिनेमा उद्या (18 एप्रिल) रिलीज होत आहे. रिलीजपूर्वी मुंबईत या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. स्क्रिनिंगला बी टाऊनमधील अनेक चर्चित चेहरे दिसले. '2 स्टेट्स' हा सिनेमा करण जोहर आणि साजिद नाजियाडवाला यांची निर्मिती आहे. स्क्रिनिंगवेळी करण जोहर आवर्जुन हजर होता.
'2 स्टेट्स'मध्ये आलिया-अर्जुन मेन लीडमध्ये आहे. हे दोन्ही स्टार्स स्क्रिनिंगवेळी हजेरी लावणा-या सेलिब्रिटींचे स्वागत करताना दिसले. या स्क्रिनिंगला करिश्मा कपूर, विक्रम फडणीस, अमृता अरोरा, राजीव मसंद, सोनाक्षी सिन्हा, मलायका अरोरा खान, सोशलाइट अनु दीवानसह बरेच सेलेब्स दिसले.
हा सिनेमा अभिषेक वर्मन यांनी दिग्दर्शित केला आहे, तर शंकर-एहसान-लॉय या सिनेमाचे संगीतकार आहेत. चेतन भगत यांच्या '2 स्टेट्स' या गाजलेल्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे.
पुढील स्लाईड्सवर पाहा '2 स्टेट्स'च्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी क्लिक झालेली सेलेब्सची खास छायाचित्रे...