आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा बोहल्यावर चढणार नाही करिश्मा, करीनाने केला खुलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: करीना कपूर आणि करिश्मा कपूर
मुंबई: उद्योगपती पती संजय कपूरपासून विभक्त झाल्यानंतर करिश्मा दुसरा संसार थाटणार अशा चर्चा रंगल्या होत्या. दोघांनी घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल केला आहे. दोघेही विविध व्यक्तींसोबत डेट करत आहेत. परंतु करीना कपूरचे म्हणणे आहे, की करिश्मा पुन्हा लग्न करणार नाहीये.
करिश्मा कपूरची सध्या उद्योगपती संदीप तोशनिवाल यांच्याशी जवळीक वाढली आहे. बातम्या आहेत, की पती संजयपासून विभक्त झाल्यानंतर ती उद्योगपती संदीप तोशनिवाल यांच्यासह लग्नाची योजना करत आहे. संदीप हेसुध्दा घटस्फोटीत असून त्यांना दोन मुली आहेत. मात्र ताजी बातमी अशी आहे, की करीना कपूरने करिश्माच्या पुन्हा लग्न करण्याच्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, करिश्माचे वैवाहिक जीवन अडचणीत असताना संदीप यांनी तिला आधार दिला होता. एवढेच काय, संदीप यांनीच करिश्माला कायदेशिर बाबींसाठी मदत केली. करिश्माला मानसिक आघातातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी बरीच मदतदेखील केली.
करीनाने एका प्रसिध्द वर्तमानपत्राशी बातचीत करताना सांगितले, 'भांडण होण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. करिश्मा आता कधीच दुसरे लग्न करणार नाहीये. तिला शांततेत आयुष्य जगण्याची संधी द्यावी असे मला वाटते. तिच्यासाठी हा खूप वाईट काळ आहे.' करीनाला फॅमिली प्लानिंग कधी करणार असे विचारल्यानंतर तिने सांगितले, 'मला आणि सैफला पुढील दोन वर्षे तरी बेबी नकोय. सध्या आम्ही आमच्या करिअरवर फोकस करत आहोत.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा संजयशी लग्न होण्यापूर्वी अभिषेक बच्चनसह झाला होता करिश्माचा साखरपुडा... सैफ अली खानने केले संजय-करिश्माला घटस्फोटासाठी केले राजी...