संजय कपूर आणि करिश्मा कपूरच्या लग्नानंतर दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. प्रकरण न्यायालयात गेले आणि शेवटी दोघांनीही समजूतदारपणा दाखवत सोबत राहण्यास सुरुवात केली. अशा घटना दोन वेळा घडल्या. याशिवाय लहान-मोठय़ा भांडणामध्ये करिश्माला सतत दिल्लीहून मुंबईला यावे लागत होते. गेल्या काही काळापासून ती पूर्णपणे मुंबईत शिफ्ट झाली आहे.
एका फ्लॉप चित्रपटानंतरही ती सेलिब्रिटी लेखक बनली. यादरम्यान तिने काही पुस्तकेसुद्धा लिहिली. पेज थ्री पाटर्य़ांचा भाग बनलेल्या करिश्माला बॉलिवूड करिअर पुन्हा सुरू करण्यात अडचणी येत आहेत. आता तिचा पती संजय कपूरने मुलांच्या कस्टडीबाबत पुन्हा करिश्माला न्यायालयात खेचण्याचा निर्णय घेतला आहे. समायरा आणि कियान आई करिश्मासोबत मुंबईमध्येच राहत होते. जर या वेळी दोघांमध्ये तडजोड झाली नाही तर करिश्माला दीर्घ कायदेशीर लढाईचा सामना करावा लागणार आहे.