(फाइल फोटोः कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेक)
मुंबईः
राखी सावंत, वीणा मलिक,
पूनम पांडे याच अभिनेत्री आणि आयटम गर्ल्स उत्तेजक कपडे आणि बोल्ड फोटोशूट्स करतात, असे जर का तुम्हाला वाटते असेल तर तसे मुळीच नाहीये. या यादीत आणखी एका नावाचा उल्लेख होणे महत्त्वाचे आहे. हे नाव आहे कश्मिरा शाह.
आपल्या बोल्डनेससाठी ओळखल्या जाणा-या कश्मिराचा आज (2 डिसेंबर) 44वा वाढदिवस आहे.
अनेक सौंदर्य स्पर्धेची ही विजेती ठरली आहे. मिस युनिव्हर्सिटी वर्ल्ड आणि मिस इंडिया टॅलेंटचा किताब तिने आपल्या नावी केला आहे. 1997 साली 'येस बॉस' या सिनेमाद्वारे कश्मिराने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 2002 साली तिने ब्रॅड लिस्टर्मनबरोबर लग्न केले होते. मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
कृष्णा अभिषेकसोबत आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये...
टीव्ही इंडस्ट्रीतील हॉट पॉप्युलर जोडी कश्मिरा शाह आणि कृष्णा अभिषेकच्या अफेअरला जवळपास सात वर्षे पूर्ण झाली आहेत. ग्लॅमर जगतात नाते जास्त काळ टिकून राहात नाही. मात्र कृष्णा आणि कश्मिरा त्याला अपवाद आहेत.
असे सांगितले जाते, की कृष्णा आणि कश्मिराचे नाते कृष्णाच्या घरच्यांना मान्य नाहीये. त्यामुळे त्यांना अद्याप लग्नासाठी परवानगी मिळालेली नाही. एका मुलाखतीत कश्मिरा म्हणाली होती, की कृष्णावर प्रेम करायला कुणाची परवानगी घेतली नव्हती, तर मग लग्न करण्यासाठी कुणाच्या परवानगीची काय गरज आहे. ? कृष्णा अभिनेता गोविंदाचा भाचा आहे.
अशी सुरु झाली कश्मिरा-कृष्णाची प्रेमकहाणी...
एवढ्या वर्षांनंतरही कृष्णा आणि कश्मिरा यांच्या प्रेमाचा धागा कायम आहे. मात्र या दोघांची प्रेमकहाणी कशी सुरु झाली हे फारच थोड्या जणांना ठाऊक आहे. कृष्णाच्या प्रेमात कशी पडली, याविषयी कश्मिराने काही दिवसांपूर्वी मीडियाला सांगितले होते.
कश्मिरान म्हणाली होते, ''पहिल्या भेटीतच आम्ही दोघेही शारीरिकरित्या एकमेकांकडे आकर्षित झालो होतो. त्यामुळे आमची पहिलीच भेट वन नाईट स्टॅण्डमध्ये बदलली. आमची पहिली भेट 'पप्पू मिल गया' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. रात्रीची वेळ होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सजन
सोनीजी माझ्याकडे चित्रपटाची ऑफर घेऊन आले. माझ्या अपोझिट कृष्णा असल्याचे सजन यांनी सांगितले आणि त्यांनी माझी भेट कृष्णाशी घडवून दिली. व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या प्रेमाला सुरुवात झाली. रात्र झाली होती आणि आम्ही दोघेही व्हॅनमध्ये बसलो होतो. तेव्हा अचानक लाईट गेले. कृष्णाने मला विचारले, आता काय करुया. मी त्याला विचारले, का काही करायचे आहे का ? त्या रात्री आमच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले होते. अशाप्रकारे आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बर्थ डे गर्ल कश्मिराचा ग्लॅमरस अंदाज...