(फाइल फोटोः ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी)
मुंबई - ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचे आज (25 नोव्हेंबर) निधन झाले. त्या 95 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून सितारा देवी आजारी होत्या. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. आज जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गेल्या सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी कथ्थक नृत्याद्वारे नटराजाची आराधना केली. सितारादेवी यांना त्यांच्या नृत्य कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सम्मान यांसारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने कलासृष्टीवर शोककळा पसरली आहे.
सितारा देवी यांचा अल्पपरिचय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...