मुंबई: बॉलिवूडचा 'रॉकस्टार' अर्थातच रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बातमी आहे, की दोघे फिक्सबर्गच्या एका हॉटेलमध्ये हनीमून कॉटेमध्ये दिसले. रणबीर आणि कतरिना फिक्सबर्गमध्ये 'जग्गा जासूस' सिनेमाचे शुटिंग करत होते. यादरम्यान ते एका हॉटेलच्या कॉटेजमध्ये थांबले होते.
सांगितले आहे, की हे कॉटेज फक्त हनीमून कपल्ससाठी रिझर्व्ह केले जाते. मात्र, रणबीर आणि कतरिनाला या कॉटेजमध्ये थांबल्याने चर्चांना उधाण आले आहे. एका प्रसिध्दा मिडिया हाउसनुसार, जेव्हा 'जग्गा जासूस'च्या क्रू मेंबर्सने रणबीर-कतरिनाने हनीमून कॉटेज शेअर केल्यानंतर त्याना चिडवण्यास सुरूवात केली, तेव्हा दोघांनी सर्व परिस्थीत मजाकमध्ये घेतली.
फिक्सबर्गव्यतिरिक्त सिनेमाचे शुटिंग जोहान्सबर्गम आणि केपटाउनमध्येसुध्दा झाले. रणबीर आणि कतरिना केपटाउनमध्ये सिनेमाच्या शुटिंगवेळी हातात हात घालून फिरताना दिसले होते.
दक्षिण अफ्रिकेहून शुटिंग संपवून आलेल्या कतरिना आणि रणबीरला करन जोहरच्या घराबाहेर कारमध्ये बघितल्या गेले होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चा नेहमी माध्यमांमध्ये येत असतात, मात्र दोघे सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याचा स्वीकार करत नाहीत.
अलीकडेच अशी बातमी आली, की रणबीर कतरिनासह नवीन घरात शिफ्ट होणार आहे. माध्यमांनी याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सांगितले, 'मला कोणासोबत तरी शिफ्ट व्हायचे आहे, मला ही गोष्ट खासगी ठेवायची आहे. कारण मी आता अविवाहित आहे आणि ज्या दिवशी माझे लग्न होईल तेव्हा तुम्हाला समजेलच.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'जग्गा जासूस' शुटिंगदरम्यानची रणबीर आणि कतरिनाची 6 छायाचित्रे...