आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif Delays Shooting With Ranbir Kapoor For The Promotions Of Bang Bang

'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी कतरिनाने टाळले रणबीरसोबतचे शूटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ)
मुंबई: बी-टाऊनच्या व्यस्त अभिनेत्रींपैकी एक कतरिना कैफ एकापाठोपाठ एका सिनेमांच्या शूटिंग उरकत आहे. हृतिक रोशन आणि कतरिना अभिनीत 'बँग बँग' लवकरच थिएटरमध्ये दाखल होत आहे. अलीकडेच, कतरिनाने हृतिकसह या सिनेमाचे शूटिंग संपवले आहे. सध्या ती सैफ अली खानसह लंडनमध्ये 'फँटम'चे शूटिंग करत आहे.
बातमी अशी आहे, की 'बँग बँग'च्या टीमला लवकरात-लवकर सिनेमाचे प्रमोशन सुरु करायचे आहे. त्यामुळे कतरिनाचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसह 'जग्गा जासूस'चे शूटिंग रखडू शकते. बातमी आहे, की कतरिनाला या सिनेमाचे शूटिंग सोडून 'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी जावे लागणार आहे.
कतरिनाच्या संबंधित एका सूत्राने सांगितले, की कतरिना सध्या हार्डवर्क करत आहे. विविध प्रोजेक्ट्सच्या विविध वेळापत्रकांचे ती योग्यरित्या व्यवस्थापन करत आहे. 'बँग बँग'च्या प्रमोशनसाठी दिलेल्या तारखा आणि 'जग्गा जासूस'च्या शूटिंगच्या तारखा एकत्र झाल्या आहेत.
कतरिनाने दिग्दर्शक अनुराग बसुला 'जग्गा जासूस'च्या शूटिंगच्या तारखांमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. जेणेकरून ती तणावमुक्त होऊन 'बँग बँग'चे प्रमोशन करू शकेल. अनुरागनेसुध्दा कतरिनाच्या विनंतीला मान देत शूटिंगच्या तारखा बदलल्या आहेत.