आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकसोबत डान्स करताना कतरिनाला येते मजा, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हृतिक रोशन आणि कतरिना कैफ)
मुंबईः हृतिक रोशन आणि कतरिना कैफ यांच्या आगामी 'बँग बँग' या सिनेमाचे टायटल साँग अलीकडेच लाँच करण्यात आले. यावेळी हे दोघेही उपस्थित होते. येत्या 2 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
'शीला की जवानी' आणि 'चिकनी चमेली'सारख्या आयटम नंबर्सवर परफॉर्म करणा-या कतरिनाने स्वतःला तिच्या समवयीन अभिनेत्रींच्या तुलनेत उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून सिद्ध केले आहे. कतरिनाने टायटल साँगच्या लाँचवेळी ऑनस्क्रिन डान्स पार्टनर हृतिकविषयीच्या अनेक रंजक गोष्टी पत्रकारांसोबत शेअर केल्या.
कतरिनाने सांगितले, की तिला सलमान खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार यांच्यापेक्षा हृतिक रोशनसह डान्स करताना जास्त मजा येते. डान्सिंगसाठी हृतिकच बेस्ट पार्टनर असल्याचे कतरिनाने म्हटले.
तर हृतिकने सांगितले, की त्याची दोन्ही मुले हृहान आणि हृदान यांना 'बँग बँग'चा प्रोमो खूप आवडला आहे. इतकेच नाही तर त्यांनी घरी माझे स्टंट्सुद्धा करुन बघण्याचा प्रयत्न केला. हृतिकने म्हटले, माझी मुले 8 आणि 6 वर्षांची आहे, ट्रेलर बघून त्यांनी जंप करणे सुरु केले होते. हे बघून मला आनंद झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटची निवडक छायाचित्रे...