आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ती एन्गेजमेंट रिंग नव्हे\', साखरपुड्याच्या बातमीला कतरिनाने लावले फेटाळून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कतरिना कैफच्या बोटातील अंगठी, ज्यामुळे ती आली चर्चेत)
अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या अभिनेत्री कतरिना कैफच्या बोटात एक अंगठी दिसली. तेव्हापासून ही अंगठी तिच्या आणि रणबीरच्या साखरपुड्याची असल्याचे म्हटले जात आहे. दोघांनी गेल्यावर्षी म्हणजे 30 डिसेंबर 2014 रोजी लंडन येथे साखरपुडा केल्याचे वृत्त आले होते. असेही म्हटले गेले होते, की या खासगी समारंभात केवळ दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते.
मात्र, अद्याप यावर कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्याने या बातम्या किती अफवा आणि किती ख-या आहेत, हे रणबीर-कतरिनालाच ठाऊक.
कतरिना कैफच्या प्रवक्त्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी सखारपुडा केलेला नाहीये. कतरिनाच्या बोटात दिसलेली अंगठी साखपुड्याची नाहीये. दोघे जेव्हा कधी साखरपुडा किंवा लग्न करतील तेव्हा ते सार्वजनिकरित्या करणार आहेत. यांचे लग्न दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीने होईल.
जेव्हा रणबीर आणि कतरिनाच्या साखरपुड्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते, तेव्हा असे म्हटले गेले होते, की या समारंभात रणबीरचे वडील ऋषी कपूर आई नीतू दोघेही लंडनला गेले होते. असेही म्हटले गेले, की ऋषी आणि नीतू या नात्याच्या विरोधात होते आणि रणबीर-कतरिनाच्या लिव्ह-इनमध्ये राहण्याच्या निर्णयाला त्यांनी पूर्णत: विरोध दर्शवला. परंतु त्यांनी दोघांचा साखरपुडा झाल्यानंतर दोघांना सोबत राहण्याची परवानगी दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मुंबईत आयोजित उमंग या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कतरिनाची खास छायाचित्रे...