आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Katrina Kaif, Saif Ali Khan, Hrithik Roshan: Bollywood Stars And Their Crazy Tantrums

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हृतिकपासून ते प्रियांकापर्यंत, या बॉलिवूड स्टार्सचे हे अजब-गजब नखरे ऐकून तुम्ही व्हाल अचंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतःला आरशात न्याहाळताना हृतिक रोशन
बी टाऊनच्या सेलिब्रिटींची प्रत्येक गोष्ट निराळी असते. आज आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या विचित्र नख-यांविषयी सांगत आहोत. हे नखरे जर सामान्य माणसांनी दाखवले, तर त्यांची गणना मुर्खात केली जाईल. मात्र हेच नखरे सेलिब्रिटींच्या स्टाईल स्टेटमेंट ठरतात. उदाहरण द्यायचे झाल्यास 'मिशन इम्पॉसिबल 4'च्या प्रमोशनवेळी जेव्हा हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूज भारतात आला होता, तेव्हा त्याने ताज पॅलेस हॉटेलमधील एक रुम नव्हे तर चक्क एका फ्लोअरचे तापमान सेट करण्याची डिमांड केली होती. या बातमीची बरीच चर्चा झाली होती. टॉम क्रूज आपल्यासोबत एका शेफला घेऊन आला होता.
सेलिब्रिटींचे अजब-गजब नखरे निर्माता-दिग्दर्शकांना घामावून सोडतात. या स्टार्सच्या नख-यांच्या त्यांच्या इमेजवर परिणाम होऊ नये, यासाठी एक पीआर टीमसुद्धा काम करत असते. या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील काही स्टार्सविषयी सांगत आहोत, ज्यांच्या विचित्र सवयी आणि मागण्यांना तुम्ही त्यांचे नखरेच म्हणाल...
हृतिक रोशन
हृतिक रोशन बी टाऊनमधील डिमांडिंग अभिनेत्यांपैकी एक आहे. या सुपरस्टारची एक सवय सर्वांना अचंबित करणारी आहे. हृतिक एखाद्या मुलाखत किंवा फोटोशूटपूर्वी मोठ्या आरशात स्वतःचा चेहरा बघणे पसंत करतो. आता यात काय विचित्र असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. अहो हृतिकला एखाद्या लहानसा आरसा नव्हे तर मोठा आरसा पाहणे पसंत आहे. हृतिकचा स्पॉट बॉय सतत आपल्यासोबत एक मोठा आरसा ठेवतो. मग हृतिक मुंबईत असो, किंवा मुंबईबाहेर, त्याच्या स्पॉटबॉयकडे एखाद्या ड्रेसिंग डेबलच्या आरशापेक्षा मोठा आरसा नेहमी सोबत असतो.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बी टाऊनच्या आणखी काही स्टार्सच्या विचित्र नख-यांविषयी...