मुंबईः 'बँग बँग' या सिनेमाने
बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. वर्ल्डवाइड या
सिनेमाने दोनशे कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. केवळ भारतात या सिनेमाचा तिकिटबारीवर दीडशे कोटींचा गल्ला जमला आहे. याचे क्रेडिट सिनेमात मुख्य भूमिका साकारणा-या हृतिक रोशन आणि कतरिना कैफला जाते. सिनेमाच्या रिलीजनंतर कतरिना कैफ पहिल्यांदा कॅमे-यासमोर आली. सिनेमाच्या यशाचा आनंद यावेळी तिच्या चेह-यावर स्पष्ट झळकत होता.
यावेळी कतरिना ब्लॅक आउटफिटमध्ये नेहमीप्रमाणे आकर्षक दिसली. ब्लॅक टॉप, ब्लॅक ब्लेजर आणि शॉर्ट स्कर्ट तिने परिधान केला होता.
आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी पिंक लिपस्टिक कतरिनाने लावले होते.
'बँग बँग' या सिनेमात हृतिकसोबत कतरिनानेसुद्धा थरारक स्टंट केले होते. दुस-यांदा ही जोडी पडद्यावर एकत्र आली आहे. यापूर्वी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात हृतिक-कतरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला पडली होती.
'बँग बँग' हा सिनेमा सिद्धार्थ राज आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. 'नाइट अँड डे' या हॉलिवूड सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमानंतर आता कतरिना 'जग्गा जासूस', 'फँटम' आणि 'फितूर' या सिनेमाच्या चित्रीकरणात बिझी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कतरिनाची क्लिक झालेली खास छायाचित्रे...