मुंबई: पुढच्या महिन्यात
सलमान खानची बहीण अर्पिता खान लग्नगाठीत अडकणार आहे. बातमी आहे, की बॉलिवूडमधून बरेच सेलेब्स या लग्नात सामील होऊ शकतात. यांच्यासह सलमानची एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफसुध्दा येऊ शकते. अलीकडेच, कतरिनाला विचारण्यात आले होते, की अर्पिताच्या लग्ना सामील होणार आहेस का? यावर तिने सांगितले होते, 'हो नक्की, मी या लग्नात जाणार आहे.'
सलमान आणि कतरिनाचे ब्रेक-अप झाल्यानंतर दोघांमध्ये दूरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. गेल्या वर्षी कतरिना सलमानच्या घरी श्रीगणेशाच्या पूजेत सामील झाली होती. परंतु यावर्षी ती गणेश फेस्टीव्हलवेळी सलमानच्या घरी गेली नव्हती. त्यामुळे कतरिना अर्पिताच्या लग्नात सामील होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.
अर्पिताच्या लग्नात कतरिना-सलमान एकमेकांसमोर आल्यानंतर काय होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्पिता खान आणि तिच्या फ्रेंड्ससह कतरिनाची काही छायाचित्रे...