आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif's Sister To Do An Item Number In Her Upcoming Film

पाहा आयटम नंबरद्वारे फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणा-या कतरिनाच्या बहिणीची छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बहीण कतरिना कैफसह इसाबेल)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल लवकरच 'डॉ. कॅबी' या कॅनडियन सिनेमाद्वारे फिल्मी दुनियेत पदार्पण करणार आहे. या सिनेमात इसाबेलसह कॅनेडियन अभिनेता विनय विरमानी आणि ब्रिटीश-इंडियन अभिनेता कुणाल नैयर झळकणार आहे. सिनेमात इसाबेल कुणाल नैयरसह रोमान्स करताना दिसणार आहे.
'डॉ. कॅबी'मध्ये इसाबेलचा एक आयटम नंबरसुद्धा असणार आहे. हा डान्स नंबर कतरिनाच्या गाजलेल्या 'शीला की जवानी'सारखा असल्याची चर्चा आहे. कतरिना आपल्या बहिणीच्या डेब्यू सिनेमावर लक्ष देऊन आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कतरिना सतत इसाबेलच्या भूमिकेविषयी आणि रिलीजच्या प्लानिंगविषयी विचारपूस करत असते. जेव्हा तिला इसाबेलच्या 'दाल मखनी' या गाण्याविषयी कळले, तेव्हा तिने आपल्या लाडक्या बहिणीचा डान्ससुद्धा बघितला.
'डॉ. कॅबी' या सिनेमाविषयी...
'डॉ. कॅबी' या सिनेमाचे दिग्दर्शन कॅनडियन दिग्दर्शक जीन फ्रँक्वॉइस यांनी केले आहे. 25 मिलियन डॉलरचे बजेट असलेला हा सिनेमा येत्या सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार आहे.
MMSमुळे प्रसिद्धीझोतात आली होती इसाबेल...
एका अश्लील एमएमएसमुळे इसाबेल अचानक प्रसिद्धीझोतात आली होती. इसाबेलच्या चेह-याशी साधर्म्य साधणारी मुलगी या एमएमएसमध्ये दिसत होती. अद्याप ती मुलगी इसाबेलच होती की दुसरी कुणी हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
इसाबेलला एकुण आठ बहिणभावंड आहेत. आहेत. कतरिना, हबीबा, इशेल, एनीला, आयशा आणि मारिया ही तिच्या बहिणींची नावे आहेत. तर मायकल हे तिच्या भावाचे नाव आहे. तिच्या वडिलांचे नाव मोहम्मद कैफ आणि आईचे नाव सुझान आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इसाबेल कैफची निवडक छायाचित्रे...