आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानविना कतरिनाच्या करिअरला लागली घरघर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बॅँग बॅँग'चे शूटिंग शेड्युल विस्कळीत होण्याबरोबरच हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार नसल्याचे समजते. असे झाले तर यावर्षी कतरिनाचा एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही. सलमानपासून वेगळे झाल्याच्या तीन वर्षानंतर काही चित्रपट यशस्वी ठरले असतानाही कतरिनाच्या करिअरला दृष्ट लागली आहे. सलमानसोबत ब्रेकअप झालेले असतानाही अरबाज खानने कतरिनाला आपल्या बॅनरच्या 'डॉली की डोली' चा प्रस्ताव दिला. मात्र, तिने महिलांवर आधारित असलेल्या या चित्रपटालादेखील नकार दिला.
सलमान खानसोबत 2010 मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर कतरिना कैफच्या आयुष्यात आणि करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. फ्लॉप चित्रपट हे त्यामागचे कारण नसून तिचे मोजकेच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. 2010 पर्यंत कतरिनाचे 4 चित्रपट प्रदर्शित झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून ही संख्या कमी कमी होत चालली आहे. यावर्षी तर तिचा कदाचित एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही.
'बॅँग बॅँग' चित्रपटाच्या प्रमुख भागांचे शुटिंग अबुधाबीत होणार होते, असे वृत्त आहे. चित्रपटाचे शेड्यूल सुरुवातीपासूनच कोलमडत आहे. आता शुटिंगने वेग घेतल्यानंतरही 2 ऑक्टोबरपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दरम्यान 2 ऑक्टोबर ही तारीख विचारात घेऊन निर्माता फॉक्स स्टार स्टुडिओने देशभरात बुकिंगही सुरू केली होती.
पुढे वाचा, एकामागून एक चुकीचे ठरत आहेत कतरिनाचे निर्णय...