आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • KBC Seven Session Starts By Subhash Nakashe Corography

‘केबीसी’ची सुरुवात मराठमोळ्या सुभाष नकाशे यांच्या कोरिओग्राफीने होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘आओ आप और हम शुरू करते हैं, कौन बनेगा करोडपती’ अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजातील या संवादाने गेले सहा सीझन भारतीय प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. 6 सप्टेंबरपासून ‘कौन बनेगा करोडपती’चा सातवा सीझन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या सीझनची ओपनिंग कोरिओग्राफी करण्याची संधी मराठमोळ्या सुभाष नकाशे यांना मिळाली आहे.


अमिताभ बच्चन यांची काही गाजलेली गाणी सोनू निगमने गायली आहेत आणि त्या गाण्यांवर बच्चन यांना कोरिओग्राफी करण्याचा सुवर्णयोग मिळाला. यानिमित्ताने अमिताभ यांना जवळून भेटता आल्याचे नकाशे म्हणाले. ‘मराठी बाणा’ या गाजलेल्या कार्यक्रमातील कोरिओग्राफी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी त्यांना पुरस्कार मिळाला आहे.


उद्यापासून प्रारंभ
सोनी टीव्हीवर शुक्रवारपासून कौन बनेगा करोडपतीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या सातव्या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अंतिम विजेत्याला सात कोटींचे बक्षीस देण्यात देण्यात येणार आहे. शोमध्ये काही सेलिब्रिटी स्पर्धही सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे केबीसीची रंगत वाढणार आहे.