आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केतकी आता \'तानी\' म्हणून येणार भेटीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शाळा' आणि 'काकस्पर्श' या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आलेली केतकी माटेगांवकर आता 'तानी' या सिनेमाद्वारे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 'तानी' हा केतकीचा आगामी सिनेमा आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला अलीकडेच नागपुरात सुरुवात झाली.

तानीची कथा एका सायकल रिक्शावाला आणि त्याच्या मुलीभोवती गुंफण्यात आली आहे. दारिद्रयात राहून सायकल रिक्शा चालवून उदरनिर्वाह करणा-या सायकल रिक्शावाल्याला आपल्या मुलीला शिकवण्यासाठी कशा प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते याचे चित्रण या सिनेमात करण्यात येणार आहे.

अरुण नलावडे यांनी या सिनेमात तानीच्या वडिलांची भूमिका साकारली असून त्यांच्यासमवेत विलास उजवणे, देवेंद्र दोडके, मदन गडकरी, डॉ. गिरीश ओक आणि ईला भाटे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. संजीव कोलते यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.