आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 मे रोजी मोठ्या पडद्यावर रंगणार 'खो-खो'चा खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सही रे सही’ सारखे अनेक यशस्वी नाटकं आणि सोबतच अनेक हिट मराठी सिनेमे मराठी सिनेइंडस्ट्रीला देणारे प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणजे केदार शिंदे. आता केदार यावेळी मोठ्या पडद्यावर खेळणार आहे 'खोखो'चा खेळ. या खेळात त्यांना साथ मिळाली आहे ती अभिनेता भरत जाधवची.

केदार शिंदे दिग्दर्शित आगामी ‘खोखो’ हा सिनेमा येत्या 22 मे रोजी रिलीज होतोय. या सिनेमाद्वारे विनोदाची आतिषबाजी करायला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे भरत जाधव.

भरतबरोबरच सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, रेशम टिपनीस, उदय टिकेकर, कमलाकर सातपुते, प्राजक्ता माळी, विजय चव्हाण, प्रशांत विचारे ही मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची फौज प्रेक्षकांना पोटधरुन हसवणार आहे. 'खोखो' ही कथा आहे मुंबईतील एका साध्या, सरळ शिक्षकाची, ज्याला देशाप्रती अतिशय प्रेम आहे. त्याच्या साधेपणाचा लोक कसे फायदा घेतात. त्यातही तो कसा ठामपणे उभा राहतो हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.

या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हिंदी पॉप संगीत विश्वात गेली कित्येक वर्षे आपली वेगळी छाप सोडणा-या उषा उथ्थुप यांनी यात एक मराठी गाणे गायले आहे. त्यामुळे मराठीत गाणी गायलेल्या हिंदीतील अनेक प्रसिद्ध गायकांच्या यादीत आता उषा उथ्थुप यांचेही नाव सामील झाले आहे. उषा उथ्थुप यांच्या आवाजातील हे खास गाणे गायिका वैशाली सामंत हिने संगीतबद्ध केले आहे.

एकंदरीतच केदार शिंदे यांच्या आधीच्या सिनेमांप्रमाणे या सिनेमातही काही तरी वेगळं आणि धमाल बघायला मिळेल हे काही वेगळे सांगायला नको. चला तर मग प्रेक्षकही हा 'खोखो'चा खेळ मस्त एन्जॉय करतील अशी आशा व्यक्त करुया.

पुढील स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा 'खोखो'चा फर्स्ट लूक...