('खुबसूरत' या सिनेमातील एका दृश्यात सोनम कपूर)
मुंबईः सोनम कपूर
आपल्या चाहत्यांना या वर्षातील दुसरी भेट देण्यासाठी सज्ज झाली आहे. सिल्व्हर स्क्रिनवर आज तिची मुख्य भूमिका असलेला 'खुबसूरत' हा सिनेमा रिलीज झाला आहे. हा यावर्षी रिलीज होणारा तिचा दुसरा सिनेमा आहे. 'बेवकूफियां' या सिनेमाच्या अपयशानंतर सोनमला 'खुबसूरत'कडून भरपूर अपेक्षा आहेत. या सिनेमाला
बॉक्स ऑफिसवर तिचे चाहते कसा प्रतिसाद देतात, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
'खुबसूरत' या सिनेमात सोनम विविध प्रकारच्या ड्रेसअपमध्ये दिसणार आहे. तिला बॉलिवूडची फॅशनेबल क्वीन म्हणून संबोधले जाते. याच कारणामुळे खासगी आयुष्यातसुद्धा ती नेहमी हटले अंदाज आणि ड्रेसेसमध्ये दिसत असते. या सिनेमात सोनम सलवार सूट्स, शॉर्टस, डेनिमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासह पाकिस्तानी अभिनेता फवाद अफजल खान झळकणार आहे. या सिनेमाद्वारे फवाद बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. शशांक घोष यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे, तर रिया कपूर आणि अनिल कपूर या सिनेमाचे निर्माते आहेत.
'खुबसूरत' हा सिनेमा 1980 मध्ये रिलीज झालेल्या अभिनेत्री रेखाच्या 'खुबसूरत' या सिनेमाचा रिमेक आहे. त्यामुळे साहजिकच या सिनेमाची तुलना जुन्या सिनेमासोबत होणार आहे. आता सोनमची जादू बॉक्स ऑफिसवर काय कमाल दाखवणार याची उत्सुकता आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सिनेमातील सोनमच्या हटके अंदाजाची निवडक छायाचित्रे...